डॉक्टर नियम

डॉक्टर नियम

अ.क्र. डॉक्टर नियम
1१} 01 ते 100 वर्षापर्यंत वयाच्या स्त्री-पुरुषास सभासदत्व मिळेल . हे कार्ड संत महंत ,गरीब , सैनिकांचे नातेवाईक, दिव्यांग व मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांच्या वैद्यकीय उपचाराकरिता मिळत आहे. संजीवनी कार्ड नोंदणी मध्ये परिवारातील फक्त एकाच व्यक्तीचा आधार नंबर नोंदणी केला जाईल व इतर वारसदार यांचे फक्त नाव असणार. या नावावरच सुविधा मिळणार.
2पेशंट यांनी दवाखान्यामध्ये प्रवेश घेते वेळेस संजीवनी कार्डची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. संजीवनी कार्ड विषयीची माहिती हे लॅबोरेटरी च्या , मेडिकलच्या, हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांनाच माहिती असते. यामध्ये काम करणारा इतर स्टाफ, नर्सेस बदलत राहतात त्यामुळे त्यांना या कार्ड ची माहिती नसेल तर ज्या डॉक्टरांचे नाव यादीमध्ये आहे त्यांनाच भेटावे. दिशाभूल होऊ नये. व हॉस्पिटल मधील सेवा मिळण्यास काही अडचणी वाटल्या तर त्याच क्षणी संस्थेला फोन करावा. तुम्हास आलेल्या अडचणींचे निवारण केल्या जाईल.
3दवाखान्यात जाण्यापूर्वी राशन कार्ड आधार कार्ड संजीवनी कार्ड सोबत ठेवावे. ऑनलाइन वरील नंबर (अपडेट) अद्यावत होत राहतात नवीन हॉस्पिटलची संख्या वाढतच राहणार आहे त्यामुळे ऑनलाईन ला असलेल्या नोंदी वरच विश्वास ठेवावा. पुस्तक प्रिंटिंग झाल्यामुळे काही तुरळक चुका असू शकतात ते कपात करता येत नसल्यामुळे ऑनलाइन बघावी सर्व माहिती ऑनलाइनलाच मिळेल.
4ऑपरेशनची/ उपचाराची बिले किती होणार आहे याची माहिती अगोदरच हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांकडून करावी.
5जर संस्थेच्या अनुषंगाने कुठला वाद उपस्थित झाल्यास सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड तसेच सक्षम दिवाणी न्यायालय नांदेड याच न्यायालयात अधिकार प्राप्त राहतील.
6सर्वच प्रकारच्या बिलासंदर्भात चौकशी करून घ्यावी. तसेच तुमचीं हॉस्पिटलची, मेडिकलची, लॅबोरेटरी नोंदणी ऑनलाईन ला आहे हे त्यांना पण वेबसाइटवरून दाखवावे. संस्थेला सूट दिल्याबद्दल चे पत्र डॉक्टरांनी व लॅबोरेटरी ,मेडिकल संचालकांनी संस्थेला दिलेले आहे .प्रत्यक्ष त्यांचे कडून प्राप्त केलेले आहे .
7बिल भरण्याच्या संबंधित काही अडचण असल्यास ज्या डॉक्टरांचे नाव यादी मध्ये आहे त्यांनाच भेटावे .ईतरांशी काहीही बोलू नये.
8प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्यास 108 या नंबर वर फोन करून ॲम्बुलन्स बोलवावी ही सुविधा सरकार तर्फे मोफत आहे. तसेच डॉक्टर यादी मधील इतर च्या कॉलमच्या बाजूला साधुसंतांचा कॉलम दिलेला आहे त्यामध्ये इतरांपेक्षा त्यांना उपचारामध्ये जास्त सूट आहे कृपया यादीतील टक्केवारी बघतांनी व्यवस्थित बघावे.
9संजीवनी कार्ड हे सरकारी नोकर वर्गाला मिळणार नाही
10संस्थेला सेवा देणारे हॉस्पिटल, मेडिकल ,लॅबोरेटरी व इतर यांचेकडून फक्त समाजसेवा म्हणून वरील संस्था सूट देत आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची पैशाची देवाण घेवाणीचा व्यवहार संस्था करीत नाही.
11सरकारी दवाखान्यांमध्ये संजिवणी कार्ड चालणार नाही. आमच्या ऑनलाईन ला असलेल्या डॉक्टर, मेडिकल , लेबोरेटरीज ,डायग्नोस्टिक सेंटर यामध्येच चालणारे आहे. संस्थेच्या प्रतिस्पर्धी संस्थासुद्धा आहे व्यवहारांमध्ये दोष ,टीका करणाऱ्या ची कमी नाही. म्हणून सभासदांनी कुठलेही अफवांना बळी पडू नये. संजीवनी कार्ड वर दिलेल्या मोबाईल नंबर वर विचारणा करावी.
12संजीवनी कार्डवर फिल्ड ऑफिसरअथवा संबंधित व्यक्तीने फेर बदल केल्यास किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित फिल्ड ऑफिसर ला काम करण्यापासून बंदी घालण्यात येईल. सरकारी नियमांचे पालन करावे. व सुरक्षित रहावे
13नवीन टेक्नॉलॉजीच्या सुविधा मिळाव्यात याकरिता काही हॉस्पिटल लॅबोरेटरी व मेडिकल जुनी जागा सोडून नवीन जागी स्थापित होतात किंवा काही आर्थिक अडचणी आल्यास बंद पण करतात .अशावेळी पत्ता न मिळाल्यास संस्थेच्या फोन नंबर वर संपर्क करावा.
14फिल्ड ऑफिसरणे ऑनलाइन कार्ड नोंदणी केल्याशिवाय कुणालाही देऊ नयेत. संजीवनी कार्डची नोंदणी ऑनलाईनला असणे आवश्यक आहे. कार्डवर नोंदणी क्रमांक चुकीचा असल्यास कार्ड मान्य केल्या जाणार नाही. सभासदाचा आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर आमच्या ऑनलाईन ला असणाऱ्या रेकॉर्डला जुळणे आवश्यक आहे.
15सर्वच सभासदांचा कार्डचा नंबर व नाव संस्थेच्या वेबसाईटवर बघता येऊ शकते. किंवा संस्थेच्या नंबर वर फोन करून विचारना करता येईल. संस्थेची वेबसाईट संजीवनी कार्ड वर दिलेली आहे. व मोबाईल नंबर पण दिलेले आहे.
16 सभासदाचा मोबाईल नंबर बदलल्यास संस्थेच्या नंबर वर कॉल करून सूचना द्यावी .
17सभासदांपैकी कुणाची अडचण असल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास ई-मेल करावा shreedattasamajsewa@gmail.com किंवा संस्थेच्या फोन नंबर वर कॉल करावा.
18संस्थेच्या या डॉक्टर यादीमध्ये ज्या संस्थांची व हॉस्पिटलची नावे नोंदणी केलेली आहे त्या-त्या डॉक्टरची व संस्था चालक व मालकाशी आम्ही चर्चा करूनच त्यांची नावे नोंदणी केलेली आहे व त्यांनी आमचे सर्व नियम व कार्डची प्रत बघूनच आम्हाला परवानगी व टक्केवारी किती प्रमाणात मिळेल असे लेखी पत्र लेटर पॅड वर लिहून दिलेले आहे.
19 टेक्निकली प्रॉब्लेम मुळे किंवा पुस्तकात छपाई करतांनी जर काही ठिकाणी टक्केवारीचे प्रमाण कमी जास्त झाले असेल. व तसे तुम्हाला आढळले तर कृपया आम्हाला ई-मेल द्वारे , फोन करून किंवा एस एम एस करून सूचना करावी. व तुरंत फोन पण करावा.
20डॉक्टरांशी सल्लामसलत करुन किती प्रमाणा मध्ये संस्थे च्या सभासदांना सूट मिळेल असे डॉक्टरांनी संस्थेला लेखी पत्र दिले आहे. हा व्यवहार बरेच प्रमाणामध्ये कंपाउंडर, सिस्टर यांना माहीत नसतो व संजीवनी कार्डाचे सभासद हे अशा लोकांकडून विचारणा करून दिशाभूल होतात कृपया आपणास सेवा न मिळाल्यास कार्ड वरील नंबर वर कॉल करावा. तसेच बऱ्याच पॅथॉलॉजी,लॅबोरेटरी हॉस्पिटलशी जुळलेले ( कनेक्टेड) असतात. त्यामुळे रक्त तपासणी करणे अगोदर संस्थेला कॉल करावा.
21संजीवनी कार्ड खूप गरीब परिस्थिती असलेल्या लोकांना सुद्धा आम्ही मोफत देत असतो. संपर्क करावा
22संजीवनी कार्ड च्या सभासदाने कुठ्ल्याही अफवांना बळी पडू नये सरळ संस्थेला कॉल करावा
23संस्थेच्या ऑनलाईनला नोंद असलेल्याच ठिकाणी सूट मिळेल. हॉस्पिटलमध्ये गैरसोय होत असल्यामुळे ही सुविधा मिळण्यास असमर्थ असलेल्या संस्थेची नोंदणी आमच्या लिस्ट वरून कमी केलेली आहे. कृपया सभासदाने नवीन लिस्ट संस्थेच्या ऑनलाईन ला नेहमी बघावी.
24संस्थेची ही सेवा जीवनभर चालणारी आहे. दर पाच वर्षांनी रिनीवल होणार. परंतू कार्ड हेच चालणारे आहे
25संजीवनी कार्ड सभासदांना पण विनंती आहे की त्यांच्या संपर्कात असलेल्या मेडिकल ,हॉस्पिटल ,लॅबोरेटरी ,सिटी स्कॅन सेंटर मध्ये काम करणारे किंवा तुमचे नातेवाईक असेल तर त्यांची नावे संस्थेच्या मोबाईलवर फोन करून कळवावे व कार्डवरून मिळणाऱ्या सेवेला मदत करावी.
26औषधी मध्ये सूट मिळण्याकरिता औषधी कमीत कमी दोनशे रुपये पेक्षा अधिक ची खरेदी असावी. सोनोग्राफी /रक्त तपासणी/.डिलेव्हरी/सिझर/इतर ऑपरेशन याकरिता संजीवनी कार्डवरील मोबाईल नंबर वर अगोदर कॉल करावा. बरेच ठिकाणी डॉक्टरला अटॅच मेडिकल व लॅबोरेटरी असतात अशा ठिकाणी सूट मिळत नाही. अशा वेळेस संस्थेला फोन करावा.
27कधीकाळी संजीवनी कार्ड हरवले तर वेबसाईटवर संजीवनी कार्डची नोंद असते फक्त तुमचा आधार नंबर फोन नंबर वरील मोबाईल नंबर वर कळवावा दुसरे संजीवनी कार्ड मिळेल.
28फिल्ड ऑफिसर ने स्वतःचा मोबाईल नंबर संजीवनी कार्ड च्या मागे लिहून द्यावा जेणेकरून सभासदाला काही अडचण असल्यास माहिती देण्यास सोपे जाईल.
29या संस्थेअंतर्गत येणाऱ्या सभासदांना मोफत उपचार देऊ इच्छिणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा संपर्क करावा. असे काही डॉक्टर आमच्याकडे आहेत की जे मोफत उपचार देतात.( फक्त गरीबांना ). व साधुसंतांना. ्माजी सैनिक व त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना काही ठिकाणी विशेष सूट देण्यात येणार आहे संपर्क करावा.
30काळाची गरज ओळखून नवीन नवीन नियम वाढत असतात कृपया सभासदाने पूर्ण नियम वाचून घेऊनच निर्णय घ्यावा.
31तुमच्या नातेवाईकांची किंवा मित्रांचे नवीन संजीवनी कार्ड काढायचे असल्यास संस्थेच्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा.
32पुस्तका मध्ये नोंदविलेले हॉस्पिटल, मेडिकल ,लॅबोरेटरी चा दिलेला पत्ता जागेच्या अभावामुळे, वयोवृद्धि झाल्यामुळे काही आर्थिक, तांत्रिक अडचणीमुळे जुनी जागा बदलतात . त्यामुळे सभासदाने संस्थेच्या ऑनलाईन ला नेहमीच बघावे. ज्या डॉक्टर चे नाव लिस्ट मध्ये ऑनलाईन ला आहे त्या हॉस्पिटल ची प्रॉब्लेम त्यांनाच भेटून करून घ्यावी इतर डॉक्टरांना भेटू नये कारण एकाच हॉस्पिटलमध्ये अनेक स्पेशालिस्ट डॉक्टर असतात व त्यांचे व्यवहार वेगळे असतात.
33पुस्तकामध्ये नोंदविलेले एकाच परिवारातील पाच /सहा व्यक्तींना हे संजीवनी कार्ड चालणारे आहे
34काही प्रमाणामध्ये ट्रेनिंग घेत असलेले डॉक्टर हे इतर डॉक्टरांकडे नोकरी करीत असतात गरजेनुसार काही डॉक्‍टर नोकरी सोडून जातात त्यामुळे त्या डॉक्टरांनी दिलेली सूट ते डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंतच मिळेल. त्यांनी त्यांची नोकरी सोडल्याची माहिती जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत त्यांचे नाव ऑनलाईनला असते. म्हणून यदाकदाचित ऑनलाईन ला ज्या डॉक्टरांचे नाव आहे ते डॉक्टर हॉस्पिटल ला आहे किंवा नाही याची माहिती सभासदाने करून घ्यावी.
35सर्व सभासदांना विनंती आहे की कोविड बाबत सर्वांना माहिती आहे दोन व्यक्तीमध्ये विशिष्ट अंतर ठेवून व्यवहार करावे .मास्क नेहमी वापरावे. .सनी टायजर सोबत ठेवावे. व दुसऱ्यांनाही वापरण्यास सांगावे. सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे. सर्दी खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास तातडीने सरकारी हॉस्पिटल गाठावे. सरकारने सांगितलेल्या नियमाचे पालन करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. आपणही नियमांचे पालन करा व दुसऱ्यांना पण सांगा. कुठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घ्यावी. अति महत्त्वाचे काम असेल तेव्हाच घराबाहेर पडा. तंबाखू ,गुटखा, पान, बिडी, सिगरेट ,दारू यापासून दूर राहा. हे व्यसन जीव घेणारे आहे जीवनदान देणारी नाही हे विसरू नका.
36एक्सीडेंट (अपघात), डिलिव्हरी, सिजर, किरकोळ शस्त्रक्रिया इत्यादी यावर लागणारा खर्च डॉक्टर कडून माहिती करून घ्यावे. यामधून मिळणारी सूट ही काही प्रमाणामध्ये वेगळी असू शकते . कारण त्या हॉस्पिटल ला बाहेरून त्यांचे स्पेशालिस्ट डॉक्टर बोलवावे लागतात. हे उपचार आयपीडी मध्ये येत नाही.
37कोरोना बिमारी मुळे काही मोजक्या ठिकाणी सुविधा मिळण्या करिता अडचणी आहे काही दिवसानंतर ही अडचण दूर होणार . तरीपण सभासदांना विनंती आहे की त्यांना हॉस्पिटलमधून, लॅबोरेटरी, मेडिकल, सोनोग्राफी मधून मिळालेली सूट त्याचे बिलाची फोटो काढून संस्थेच्या मोबाईल नंबर पाठवण्याची कृपा करावी ही आग्रहाची विनंती. कार्ड वर असणारे सर्वच मोबाईल नंबर व्हाट्सअप चे आहे.
38पुस्तकामध्ये जर हॉस्पिटलचे नाव नसेल व ऑनलाईन ला त्या हॉस्पिटल चे नाव असेल तर ऑनलाईन ला असणारे नावच ग्राह्य धरावे
39औषधी दुकानदारांची असोसिएशन असल्यामुळे काही मेडिकल औषधीमध्ये सूट देत नाही अशावेळी वाद घालू नये तुम्ही ज्या क्षेत्रांमध्ये आहेत त्या भागातील अधिकचे मेडिकल चे नंबर संस्थेच्या मोबाईल नंबरवर फोन करून कळवावे जेणेकरून आम्ही नवीन जोडणी करून देऊ
40कार्यालयीन वेळ सकाळी दहा ते सहा